अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: क्रेनच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर- बोल्हेगाव शिवारातील साईक्रांती ट्रॅक्टर शोरूमसमोरून रस्त्याने पायी जाणार्‍या प्रकाश सखाराम गायकवाड (वय 75 रा. विजयनगर, बोल्हेगाव फाटा) यांना क्रेनची धडक बसून मृत्यू झाला.

 

याप्रकरणी साई क्रेन सर्व्हिसेस वरील अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नितीन प्रकाश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

 

प्रकाश गायकवाड हे बोल्हेगाव शिवारातील साईक्रांती ट्रॅक्टर शोरूमसमोरून पायी जात असताना साई क्रेन सर्व्हिसेसवरील चालकाने त्यांना धडक दिली. या धडकेत जखमी झालेले प्रकाश गायकवाड यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक महेश दाताळ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button