अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी बस आणि स्विफ्ट कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू !

अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात बसची स्विफ्ट कारला धडक बसून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालक ठार झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

विशाल ओऱ्हा (वय 36 रा.गंगाधाम, पुणे) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 2 जून) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडला.

याबाबत सविस्तर अधिक माहीती अशी की, महाड-जळगांव आगाराची बस जळगांवकडे जात होती. स्विप्ट कार मधील पुणे येथील पाच जण शनिशिंगणापूर येथील देवदर्शन करुन देवगड येथून पुण्याकडे जात होते.

कांगोणी फाटा शिवारातील हॉटेल संगमनजिक महामार्गाच्या बाजूने गॅसवाहिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे एका बाजूने महामार्ग बंद करण्यात आला होता. यावेळी बसने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली.

भीषण अपघातात विशाल ओऱ्हा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. बस स्विफ्ट कारला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळली. सुदैवाने बसमधील सर्व सुखरुप आहेत. या घटनची शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button