अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: दोन अपघातात एक ठार, एक जखमी

अहमदनगर – दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसर्या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. कोल्हार भगवतीपूर (ता. राहाता) येथे मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला.
रोहित अरुण लोखंडे (वय 22, रा. कोल्हार) असे मृताचे नाव आहे. तो दुचाकीवरून लोणीहून कोल्हारकडे येत असताना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाजवळ समोरून येणार्या एका वाहनाची त्याला धडक बसली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला.
दुसरा अपघात आनंदऋषीजी चौकाजवळ झाला. नाजीर बाबूलाल शेख (वय 52, रा. कोल्हार) पायी चाललेले असताना त्यांना समोरून येणार्या वाहनाची जबर धडक बसली. त्यात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली. पोलिसांनी त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.