अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ पोलीस निरीक्षकांविरोधात संघटना आक्रमक; दिला ‘हा’ इशारा

अहमदनगर- नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे वादग्रस्त ठरत आहेत. आता त्यांच्या विरोधात काही संघटना आक्रमक झाल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

निरीक्षक विजय करे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे गुरुवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्यापारी संघटना व जाणता राजा ग्रुपच्यावतीने रासस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला असून याबाबत नाशिक विभागाचे डीआयजी व गृहमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.

 

व्यापारी संघटना व जाणता राजा ग्रुपच्यावतीने दोन स्वतंत्र निवेदने पाठविण्यात आली आहे. व्यापारी संघटनेच्या निवेदनात म्हटले की, पोलीस निरीक्षक विजय करे हे नेवाशाला पुन्हा बदलून आल्यापासून लोकांशी सूडभावनेने वागत आहेत. त्यांच्यामुळे जाती-धर्मात तणाव वाढत आहे. वाळू तस्कराशी संभाषाच्या व्हायरल क्लिप प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास करुन गुन्हा नोंदवावा तसेच या प्रकरणी आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी करुन कारवाई करावी. निवेदनावर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बरमेचा, सुभाष चौधरी, राजेंद्र खराडे, शिवाजी म्हस्के, राहुल मुथ्था, जावेद शेख, राजेंद्र राऊत, शेखर गोर्डे, राजेंद्र बागडे आदींची नावे आहेत.

 

जाणता राजा ग्रुपच्या निवेदनात म्हटले की, पोलीस निरीक्षक विजय करे हे जातीतधर्मात संघटनांना गट-तट तयार करुन त्यांना हाताशी धरुन स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला त्रास देत आहेत. जाती-धर्मावर विष फैलावून आपली पोळी भाजून घेत असल्याने कुकाणा परिसरात व तालुक्यात मोठा अनर्थ घडण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाईलचे सीडीआर चेक करावेत ही आमची मागणी आहे.

 

चोर्‍या लुटमार प्रकरणाच्या तपासातही त्यांना अपयश आले असून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी 1 सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवून रास्तारोको आंदोलनात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राहुल जावळे, उपाध्यक्ष इन्नूस नालबंद, गणेश पुंड, अरबाज शेख, कुणाल घाडगे, साहिल शेख, नदीम पठाण, रितेश राऊत, आरेश तांबाळे, विशाल देव्हारे आदींची नावे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button