अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: पोलिसावर गुन्हेगाराकडून प्राणघातक हल्ला

Advertisement
अहमदनगर- पोलीस अंमलदारावर गुन्हेगाराने प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले किरण पवार तडीपारची नोटीस बजावण्यासाठी गेले असता यांच्यावर अशोकनगर या ठिकाणी गुन्हेगाराने प्राणघातक हल्ला केला. त्यात पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ कुदळे (रा. राऊत वस्ती, अशोकनगर) याला हद्दपारची नोटीस बजावण्यासाठी पवार हे गेले असता त्या गुन्हेगाराने तडीपारची नोटीस स्विकारण्यास नकार दिला आणि त्यानंतर पवार यांच्या मोटरसायकलचे नुकसान करून, शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात पवार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Advertisement