अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: 20 हजार मागितल्याने पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर- शेवगाव पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संतोष चंद्रकांत काकडे यांच्यावर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदाराच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी मोटार वाहन चालकावर गुन्हा दाखल करावा यासाठी आरोपीने फिर्यादीकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती या कारणास्तव तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक सौ.शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस कर्मचारी सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, चंद्रशेखर मोरे, मनोज पाटील, विनोद पवार यांनी ही कारवाई केली.