अहमदनगर ब्रेकींग: शेतात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा

अहमदनगर- श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना वांबोरी ते नगर जाणारे रोडवर गुंजाळे गावचे परिसरात एका शेतात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे, अशी गुप्त बातमी मिळाली होती. त्यावरून सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तिन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
त्यानुसार पो.कॉ रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी रवि उर्फ संजय राजू गायकवाड (रा. गुंजाळे ता. राहुरी) याचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गु.र.न.122 /2023 महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वांबोरी परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिटके, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, सहायक निरीक्षक माणिक चौधरी, स.फौ.अकोलकर, पो.हे कॉ.चंद्रकांत ब-हाटे, पो.ना,पारधी,म.पो.ना कोहकडे, पो.कॉ ताजणे, शिंदे,साखरे,नदीम शेख, ठोंबरे आदींनी केली केली.