अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: न्यायालयात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

अहमदनगर- येथील न्यायालयात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण यांच्यासह सहकार्‍यांना एकाने मारहाण केल्याची घटना आज दुपारी घडली.

 

राजु मुरलीधर काळोखे (वय 42 रा. लालटाकी, सिध्दार्थनगर) असे मारहाण करणार्‍याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द भिंगार पोलिसांत सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कर्मचारी चव्हाण यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

 

तो आज दुपारी न्यायालयाच्या आवारात आरडाओरडा करत असताना पोलीस कर्मचारी चव्हाण व इतर त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्याने चव्हाण यांना मारहाण करून जखमी केले.

 

तसेच लॉकअप गाडीच्या खिडकीच्या काचेला डोक्याने मारून मी आत्महत्या करतो व पोलिसांना कामाला लावतो, माझ्या पत्नीला तुमच्याविरूध्द केस दाखल करण्यास सांगतो, असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button