अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: चार हजार मागणारा पोलीस लाचेच्या जाळ्यात

Advertisement
अहमदनगर- चार हजार रूपयांची लाच मागणी केल्याने राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराविरूध्द नगरच्या लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शाहमद शब्बीर शेख असे या अंमलदाराचे नाव आहे. आज ही कारवाई करण्यात आली आहे.
मुलनमाथा (ता. राहुरी) येथील एका व्यक्तीने अंमलदार शेख विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्याविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा दाखल असून सदर अदलखपात्र गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत केल्याच्या मोबदल्यात शेख याने तक्रारदार यांचेकडे चार हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे 13 ऑक्टोबर रोजी लाच मागणी पडताळणी निष्पन्न झाले होते. म्हणून शेख याच्याविरूध्द शुक्रवारी लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement