अहमदनगरकर्जतताज्या बातम्या

Ahmednagar Breaking | भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटांमध्ये अशा पद्धतीने सत्ता वाटप…

Ahmednagar Breaking : जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीच्या वेळी असाच ईश्वरी चिठ्ठी टाकून कौल घेण्यात आला. येथे भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान मते मिळाली आहेत.

ईश्वरी चिठ्ठीत सभापतिपदी भाजपचा उमेदवार तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार झाला. भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटांमध्ये अशा पद्धतीने सत्ता वाटप झाले.

चिठ्ठीने दोन्ही गटांना न्याय दिल्याने भविष्यात वाद टळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.जामखेड बाजार समितीच्या १८ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष लागले होते.

दोन आमदारांमध्ये सत्तासंघर्ष तीव्र असल्याने फोडाफोडी होणार का? कोणाचा सभापती होणार? याकडे लक्ष लागले होते. पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली. दोन्ही गटांचे संचालक ठाम राहिले.

त्यामुळे दोन्ही पदांसाठीच्या उमेदवारांना समान मते मिळाली. सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे कैलास वराट यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. समान मते मिळाल्याने लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button