अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘विप्रो’ मध्ये गुंतवणूकीचा बहाणा; साडेसोळा लाखांना चुना

अहमदनगर- ‘विप्रो’ कंपनीतून बोलते, असे सांगून एका महिलेने श्रीरामपूर येथील एका तरूणाचा विश्‍वास संपादन केला. ‘विप्रो’ अ‍ॅपव्दारे पैसे गुंतवणूक करून अधिक नफा देण्याचा बहाणा करून 16 लाख 51 हजार 301 रूपयांची फसवणूक केली. अमित त्रिंबक बाचल (वय 28 रा. गुरूनानकनगर, गोधवणी रोड, श्रीरामपूर) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

त्यांनी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका व्हाट्सअप मोबाईल नंबर धारक विना नावाच्या महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

विना नावाच्या महिलेने बाचल यांना संपर्क केला. ‘विप्रो’ कंपनीतून बोलते, असे सांगून बाचल यांचा विश्‍वास संपादन केला. सदर महिलेने ‘विप्रो’ अ‍ॅपव्दारे पैसे गुंतवणूक करून अधिक नफा देण्याचा बहाणा करून 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान बाचल यांच्याकडून वेळोवेळी 16 लाख 51 हजार 301 रूपये घेतले.

 

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे बाचल यांच्या लक्षात येताच त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button