अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ दोन भागात पुणे पोलिसांचे सर्चिंग ऑपरेशन

अहमदनगर- पुणे येथून आलेल्या पोलिसांच्या खास पथकाने आज पहाटे चार वाजल्यापासून शहरातील आलमगीर आणि मुकुंदनगर या भागात सर्चिंग ऑपरेशन राबविले. या सर्चिंग ऑपरेशनविषयी स्थानिक पोलिसांना कोणतीही कल्पना नव्हती.
आलमगीरमध्ये दहा ते पंधरा वाहने आलमगीरमध्ये आली होती, अशी माहिती मिळाली. ही वाहने पुणे जिल्हा पासिंगची होती. त्यामध्ये शस्त्रधारी पोलिस होते. आलमगीर भागामध्ये या पोलिसांकडून अनेक ठिकाणी चौकशी झाल्याचेही माहिती मिळाली. ही चौकशी नेमकी कोणत्या प्रकारची होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.