अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग ! देव दर्शनासाठी निघालेल्या पिता – पुत्रावर काळाचा घाला… अपघातात दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव (ता. नगर) शिवारात एका भयंकर अपघात झाला आहे. अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला.

बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव जोंडे ता. मालेगाव, जि. नाशिक) अशी अपघातात मृत झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बाजीराव मिसकर हे हरीयाणा राज्यात सैन्य दलात नोकरीला होते. ते सुट्टी निमित्त गावी आले होते. रविवारी रात्री ते त्यांच्या कारने मुलगा ओमसह जेजुरी (पुणे) येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारातून जात असताना त्यांच्या कारची समोरील वाहनास धडक बसली.

या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये दोघा पिता-पुत्राचा जीव गेला. अपघातातनंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button