अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: रेशनिंगचा साठा जप्त; पुरवठादाराच्या मारहाणीत दोघे गंभीर

अहमदनगर- अवैधरित्या साठवून करून ठेवलेला रेशनिंगचा गहू आणि तांदूळ भानसहिवरे (ता. नेवासा) गावात स्थानिक नागरिकांनी पकडला. सदरचा साठा हा तालुका पुरवठादाराने अवैधरित्या साठवून ठेवला होता.

 

दरम्यान रेशनिंगचा साठा पकडताच संबंधित तालुका पुरवठादाराने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुरवठा पकडणाऱ्या स्थानिक नागरिकांना मारहाण केली आहे.

यातील दोघांना गंभीर मार लागला असुन त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

 

नेवासा तालुक्यात रेशनिंगचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचे भानसहिवरे गावात गोडाऊन आहे. याच गोडाऊन मध्ये अवैधरित्या गहू आणि तांदूळ साठवून ठेवला होता. याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी सुरुवातीला गाडीमध्ये भरून जाणारे सुमारे १५७ तांदळाचे कट्टे पकडले. नंतर गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला गहू आणि तांदूळ पकडला.

 

याची माहिती त्या पुरवठादाराला कळताच त्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलवून त्या नागरिकांना मारहाण केली. त्यातील दोघांना गंभीर मार लागला आहे. दरम्यान याची माहिती सोशल मीडियावरून तहसीलदार सुरेशकुमार सुराणा यांना देण्यात आली. त्यांनी व पुरवठा अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कारवाई सुरू होती.

……………

तहसीलदार म्हणतात थांबा

साठवणूक करून ठेवलेला गहू आणि तांदूळ पकडला का? यासंदर्भात तहसीलदार सुरेशकुमार सुराणा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भानसहिवरे गावात हा साठा पकडला आहे. हा साठा कोणाचा व किती आहे याची माहिती देण्यास त्यांनी स्पष्ट नकार देत थांबा, वेळ लागेल असे सांगितले. सदरचा साठा कोणाचा आहे, याची सुद्धा माहिती त्यांनी दिली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button