अहमदनगरताज्या बातम्याराहुरी
अहमदनगर ब्रेकिंग : साधुने काढली तरुणीची छेड तरुणांनी केलं असे काही…

तामीळनाडू येथून आलेल्या एका साधुने राहुरी तालुक्यात क्लासला जात असलेल्या एका तरुणीची छेड काढल्याचा प्रकार दिनांक २५ मे २०२३ रोजी घडला.
हा प्रकार लक्षात येताच काही तरुणांनी साधुची यथेच्छ धुलाई करून त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील एक कॉलेज तरुणी दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्लासला जात होती.
त्यावेळी दाढी व जटा वाढलेल्या एका साधुने नशा केलेल्या अवस्थेत त्या मुलीचा पाठलाग करून तीची छेड काढली. तेव्हा त्या मुलीने आरडाओरडा केला असता परिसरातील काही तरुणांनी त्या साधुला पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली. नंतर त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.
Advertisement