अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : सहा वर्षीय मुलीवर अत्याचार; आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आरोपी अटकेत

शेवगाव शहरात गरीब कुटुंंबातील एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (१ जून) घडली.

शुक्रवारी (३ जून) अत्याचारीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन रविंद्र मोहन कोपरगे (वय-३५) रा.इंदिरानगर,शेवगाव याच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराचा ( बलत्काराचा ) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही शहरातील इंदिरानगर भागात कुटुंंबासह राहत आहोत. मोलमजुरी हे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.

रविंद्र कोपरगे हा आमच्या घरासमोरच एकटाच रहाण्यास होता. बुधवारी रात्री ८ वाजता घरात सर्व जण जेवण करीत असताना सहा वर्षाची मुलगी रडत घरी आली.

तिने कोपरगे याने धमकावत कपडे काढून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन अत्याचार केल्याचे सांगितले. घरातील सर्वजण त्याच्याकडे गेलो असता तो पळून गेला.

त्यानंतर मुलीला शेवगाव ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केल्याची फिर्याद दाखल केली.

यावरून पोलिसांनी रविंद्र मोहन कोपरगे याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button