Ahmednagar Breaking: …म्हणून व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला

ऊसणे दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून वाहन खरेदी-विक्रीचा व्यावसाय करणार्या व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करत त्यांना मारहाण केली.
काल रात्री साडेअकरा वाजता बोल्हेगावमध्ये ही घटना घडली. देवेंद्र भगवान शर्मा (वय 30 रा. कातोरे वस्ती, बोल्हेगाव) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
मारहाण करणारे गणेश वाकळे, विनोद, आकाश पठारे,p (पूर्ण नावे माहिती नाही) व इतर अनोळखी आठ (सर्व रा. बोल्हेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी शर्मा यांनी फिर्याद दिली आहे. गणेश वाकळे व विनोद हे शर्मा यांच्या ओळखीचे असल्याने शर्मा यांनी त्यांना पाच हजार रूपये हात ऊसणे दिले होते.
मंगळवारी (दि. 19) सकाळी शर्मा यांनी त्यांना पैशाची मागणी केली. नंतर देतो असे म्हणून गणेश व विनोद निघून गेले. बुधवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजता गणेश, विनोद, आकाश, प्रथम व इतर आठ असे शर्मा यांच्या घरी आले. गणेश व विनोद हे शर्मा यांना म्हणाले,‘
तु दिलेले पैसे आम्ही देणार नाही, तुला काय करायचे ते कर’, तेव्हा शर्मा त्यांना म्हणाले,‘मी दिलेले पैसे तुम्हाला द्यावेच लागतील’, असे म्हटल्याचा राग आल्याने आकाश व प्रथम यांनी शर्मा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
विनोदने कोयत्याने शर्मा यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शर्मा यांच्या घरातील व्यक्तींना आरोपींनी मारहाण केली. झटापटीत शर्मा यांची आई व पत्नीच्या गळ्यातील दागिणे गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.