अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; आठ लाखांचा अवैध मद्याचा साठा जप्त

अहमदनगर- राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने गुरूवारी चिलवडी शिवार, राशीन करमाळा रोडवर, (ता. कर्जत) येथे कारवाई करून आठ लाख 28 हजार 100 रूपयांचा अवैध गोवा राज्य निर्मितीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

 

याप्रकरणी उत्तरेश्वर गोरख बदे (रा. वलटे वस्ती, उमरड, ता. करमाळा जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे.

 

परराज्यातील मद्य, महाराष्ट्रात आणून त्याची अवैध विक्री करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे समोर आले आहे. या आरोपीविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button