अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘सेक्स पॉवर’ वाढविणार्‍या गोळ्यांचा साठा आढळला

गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा आढळून आलेल्या ट्रान्सपोर्टमध्ये ‘वाइल्डमोर- 100’ कंपनीच्या गोळ्यांचा साठा मिळून आला आहे. या गोळ्या अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात येत होत्या.

त्याचा वापर ‘सेक्स पॉवर’ (शक्ती वर्धक) वाढविण्यासाठी होत असल्याची माहिती आहे. आयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत श्रीराम एजन्सीच्या नावेच या गोळ्या आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुमारे 20 हजार गोळ्या मिळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. औषध प्रशासनाने याचे नमुने घेतले आहेत. 5 मे, 2022 रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने सुमारे नऊ हजार गर्भपाताच्या गाळ्यांचा साठा जप्त केला होता.

या प्रकरणी श्रीराम एजन्सीचा मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि आयव्हीए हेल्थ केअर कंपनीच्या (पंचकूला, हरियाणा) संचालक मंडळाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त ज्ञानेश्‍वर दरंदले यांनी फिर्याद दिली होती. उपनिरीक्षक पाठक या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तपासादरम्यान ट्रान्सपोर्ट कंपनीत श्रीराम एजन्सीच्या नावे ‘वाइल्डमोर- 100’ कंपनीच्या शक्ती वर्धक गोळ्या आल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक पाठक यांनी सदर गोळ्यांचा साठा तपासकामी जप्त केला आहे. पोलिसांकडून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. पोलीस तपासकामी हरीयाणा येथे कंपनीला भेट देणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button