अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक; कर्मचारी जखमी

अहमदनगर- शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. आज दुपारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत काही कर्मचारी जखमी झाले आहेत.

मनपाकडून अतिक्रमण मोहिम सुरू आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अतिक्रमण पथक जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेले होते. जेसीबीच्या सहय्याने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असताना पथकावर काही जमावाने दगडफेक केली.

यामध्ये काही कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचार्‍यांवर रूग्णालयात उपचार चालू आहेत. तर काही कर्मचारी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले आहेत. दगडफेकीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मोठमोठे दगड काही लोक मारताना दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button