अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: एकाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर- राहत्या घरात एकाने फाशी घेत आपले जीवन संपवले. सुधाकर रामजी खांडीझोड (वय 55 वर्षे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे सोमवारी रात्री ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री चांदेकसारे येथे समाज मंदिर परिसरात राहत असलेल्या सुधाकर खांडीझोड यांनी घराच्या छताला दोरीच्या साह्याने फाशी घेतली. रात्री ही घटना कधी घेतली याचा उलगाडा झाला नाही. मात्र सकाळी दीपक प्रभाकर खंडीझोड यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारीपाजारी असलेल्या नागरिकांना याबाबत कळवले.

घटनेची माहिती पोलीस पाटील मीराताई रोकडे यांना दिली. डॉ गोरक्षनाथ रोकडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत संपर्क करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस उपनिरीक्षक कुसारे व पोलीस फौज घटनास्थळी दाखल झाले.

खंडीझोड यांच्या पार्थिववर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button