अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा न्यायालयाच्या आवारात तरूणाने घेतले पेटून

एका तरूणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतः ला पेटून घेतल्याची घटना आज सकाळी घडली. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे त्या तरूणाचे नाव आहे.

त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्याने स्वतःला का पेटून घेतले याची माहिती समोर आली नाही.

सकाळी ११ वाजता ऋषिकेश हा जिल्हा न्यायालयात आला होता. त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटून घेतले. यामुळे न्यायालय आवारात एकच धावपळ उडाली.

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे त्याचे म्हणणे असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी जिल्हा न्यायलयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते.

पेटून घेतल्यानंतर भिंगार कॅम्प, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button