अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ वादग्रस्त पोलीस निरीक्षकामुळे अधिवेशन गाजले; नेमकं काय घडलं

अहमदनगर – श्रीरामपुरातील धर्मांतरावरून आ. नितेश राणे यांनी विधानसभेत धर्म परिवर्तनाचे रेट कार्ड सादर केले. आ. राणे यांनी काल सभागृहात लक्षवेधीमध्ये धर्म परिवर्तनाचा मुद्दा मांडला. यावेळी हिंदू मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्याची मागणी त्यांनी केली.

 

श्रीरामपुरातील मराठी मुलीचे धर्मपरिवर्तन झाल्याची घटना नुकतीच घडली. राज्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली त्रास दिला जातो. अनेक अल्पवयीन मुलींना त्रास दिला जातो. त्यांना फसवण्यासाठी मुलांना आर्थिक ताकत दिली जाते. एक रेट कार्ड आहे की, शीख तरुणीला फसवले तर किती? हिंदी मुलीला फसवले तर किती? मराठा मुलीला फसवले तर किती? ब्राह्मण मुलीला फसवले तर किती? अशी रेट कार्ड तयार आहेत. एवढ्यावरच ते थांबत नाही, तर त्या मुलींना विकण्यापर्यंत गोष्टी जातात. याप्रकरणातील सानप नावाचे पोलीस अधिकारी आहेत, त्यांना बडतर्फ केले पाहिजे. अशा घटना घडत आहेत, यांच्यावर आळा बसण्यासाठी आपल्या राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू करणार का?, असे म्हणत नितेश राणे यांनी सरकारला प्रश्न विचारला.

 

 

नितेश राणे यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. पीडिता अल्पवयीन असताना सातत्यानं तिच्यावर तीन वर्ष अत्याचार करण्यात आला. तक्रार दाखल होऊनही पोलीस अधिकारी सानप यांनी कारवाई केली नाही. हे उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आलं आहे. नितेश राणे यांनी मागणी केल्याप्रमाणे लगेच बडतर्फ करता येत नाही, पण त्यांना कडक शिक्षा केली जाईल.

 

 

निलंबित करण्याऐवजी सानप यांना बडतर्फ करणार का? – विरोधी पक्षनेते पवार

 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, या प्रकरणात सानप यांचं निलंबन केलं. त्यापाठोपाठ तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्यामुळे पोलीस नाईकालाही निलंबित केलं. आपल्या पोलीस खात्यात निलंबन झाल्यानंतरही पोलिसांना काही वाटत नाही. कारण त्यांचा अर्धा पगार त्यांना मिळत असतो. एवढंच नाहीतर ते पोलीस असल्यासारखेच वावरत असतात. त्यामुळे कायद्यात काही बदल करून निलंबित करण्याऐवजी संबंधित अधिकार्‍यांना बडतर्फ करणार का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

 

 

तीन महिन्यात चौकशी, गरज पडल्यास बडतर्फीची कारवाई करू – फडणवीस

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संबंधित अधिकार्‍याला बडतर्फ करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आपल्याला पोलीस अधिकार्‍याला थेट बडतर्फ करायचा अधिकार आहे. याठिकाणी वापर करता येईल का बघू. गरज पडल्यास बडतर्फीची कारवाई करू. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यांत चौकशी करण्याच्या सूचना विभागाला देऊ.

Related Articles

Leave a Reply

Back to top button