अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील ‘या’ बाजार समित्यांचा निवडणूकीचा बिगुल वाजला

अहमदनगर- न्यायालयाच्या आदेशानुसार राहाता बाजार समिती आणि श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक येत्या 18 डिसेंबर रोजी होत आहे. याबाबत राज्य सरकारच्या निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या श्रीरामपूर बाजार समितीचा कारभार प्रशासक संदीपकुमार रूद्राक्ष हे पाहत आहेत.

 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 14 नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून 21 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होऊन 22 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील. 6 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 7 डिसेंबर रोजी निवडणुकीत उभ्या राहणार्‍या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर होईल. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 19 डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 

 

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक सहकारी सोसायटीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मागील वेळेस बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. जोपर्यंत सहकारी सोसायटीच्या निवडणुका होत नाही, तोपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका येऊ नये, असा आदेश असतानाही आता पुन्हा नव्याने बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हा कार्यक्रम सुद्धा वादात सापडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button