अहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : यात्रा सुरु होती अन अचानक सुरु झाली दगडफेक…या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार

Ahmednagar News :- नगर तालुक्‍यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवा दरम्यान रविवारी झालेल्या दगडफेक प्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली आहे. गावात घडलेल्या दगडफेकीने गावामध्ये तणावपूर्ण वातावरण बनले असुन भितीपोटी आज सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने गावांमध्ये शुकशुकाट दिसून आला. पोलिसांच्या वतीने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बायजामाता यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत खेळणी दुकानदार महिला व काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे यात्रेकरूंची मोठी धांदल उडाली होती. महिला, बालके, वृद्ध सैरावैरा धावत होते. दगडफेकीचा सर्वात जास्त फटका खेळणी दुकानदारांना बसला त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच महिला जखमी झाल्या होत्या. खेळणी दुकानदारांची आपल्या गावी परतण्यासाठी मोठी धडपड सुरू होती.

सदर प्रकरणी एमआयडीसी ‘पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी फिर्याद दिली आहे. इद्रीस मुनीर शेख, मन्नू अलीम कुरेशी, अजिज रफीक शेख, हर्षद बागवान, साहिल बागवान, मुनीर खैरू शेख, शेख मुस्ताक, युनुस शेख, मुसा शेख, ‘फइस रफिक शेख, अतुल उर्फ सोमनाथ सुखदेव तवले, सुनील दारकुंडे, गणेश दारकुंडे, दीपक शिंदे यांच्यासह इतर शंभर ते दीडशे लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

Advertisement

पाळण्यामध्ये बसण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. त्या मुलांनी दगडे उचलून इतर मुलांच्या पाठीमागे पळाले. यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पलायन केले व त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. त्यावेळी फिर्यादी यांनाही दगड मारून धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जेऊर गावात घडलेल्या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सद्यस्थितीत गावात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जेऊर गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अतिक्रमण ठरतोय कळीचा मुद्द
बायजामाता टेकडी परीसरात हनुमान चौथरा येथे करण्यात आलेल्या अतिक्रमणावरून जेऊर गावात दोन महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. सदर अतिक्रमण हा कळीचा मुद्दा ठरत असून कालच्या घडलेल्या प्रकाराला ‘त्या’ अतिक्रमणाचीच किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

Advertisement

यात्रेकरुंवर झालेल्या दगडफेकीचा निषेध
यात्रेत खेळण्याची दुकानदार व इतर व्यवसायिक आपल्या कुटुंबासह गावांमध्ये आले होते. दगडफेकीत खेळणी वुकानदार महिला व लहान मुले जखमी झाले. तसेच त्यांच्या दुकानांचे ही नुकसान झाले आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये अनुचित प्रकार घडल्याने सदर घटनेचा जेऊर पंचक्रोशीतून निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button