अहमदनगर
अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ बँकेला लागली मोठी आग !

अहमदनगर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीस आज सायंकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोतवाली पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.
आज सायंकाळी ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आग कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.
इमारतीतून धुराचे लाेट बाहेर येत हाेते. ही आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल पाेहोचले आहे.