अहमदनगर ब्रेकींग: एकाच वेळी तीन मुले व एक मुलगी बेपत्ता

अहमदनगर- अहमदनगर शहरातून चार जण बेपत्ता झाल्याच्या चार घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
एक विद्यार्थी पेमराज सारडा महाविद्यालयात ११ वीत शिक्षण घेत होता. २ फेब्रवारीला नेहमीप्रमाणे कॉलेजला जातो म्हणून तो घराबाहेर गेला. मात्र तो घरी आलाच नाही. त्याच्या मोबाईलही बंद आहे. तर दुसरा विद्यार्थी रेसिडेन्सिअल कॉलेज येथे शिक्षण घेत आहे. २ फेब्रुवारीला तो कोणाला न सांगता घराबाहेर गेला. अद्याप तो घरी आला नाही. त्यास अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवून पळवून नेले आहे.
तिसरा विद्यार्थी न्यू आटर्स कॉलेजला जातो म्हणून गेला. परत घरी आलाच नाही. तर ३ फेब्रुवारीला एका युवतीला सकाळी साडेदहाच्या सुमारास घराजवळून अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या चारही घटनांची कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.