अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात तीन शेतकरी ठार

अहमदनगर- पिकअप वाहनाचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. ते कांदा विकण्यासाठी सोलापूरला जात असताना बुधवारी पहाटे ही घटना घडली.

 

दत्तू भानुदास शेळके (वय 55), श्रीमलसिंग धोंडीसिंग परदेशी (वय 42) व नितीन बजंगे (वय 35) अशी या अपघातात मृत्यु झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापुर येथे कांदा विक्रीसाठी कांद्याने भरलेल्या पिकअप वाहनातून जात होते.

 

कर्जत-सोलापूर मार्गावर मोहोळजवळ पिकअप वाहनाचा अचानक टायर फुटल्याने भरधाव वाहन पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचाही उपचारांपुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेने कोरेगावावर शोककळा पसरली आहे. तीनही शेतकर्‍यांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button