अहमदनगर ब्रेकींग: साई भक्तांवर काळाचा घाला; दोन ठार, दोन जखमी

अहमदनगर- वळणावर भरधाव वेगातील कार उलटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे २ नगर-पुणे महामार्गावर चास घाटातील वळणावर घडला.
या अपघातात अजित दीपचंद पटेल (वय-२४), विकास रामनारायण विश्वकर्मा (वय-२१, दोघे रा. जय्यतपूर,मध्यप्रदेश, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे युवक मयत झाले आहेत. तर रामनारायण श्रीबालमुकुंद मेहेरा (वय-२६, रा. शिरूर) व मुकेश गोरख पाटील (वय-२८, रा. कासौदा, जि. जळगाव, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे जखमी झाले आहेत.
मयत व जखमी हे चौघे एकमेकांचे मित्र असून ते कामानिमित्त कारेगाव व शिरूर येथे राहत होते. मंगळवारी (दि.१५) पहाटे ते त्यांचा मित्र आनंदा नाईक (रा. चाकण, ता. खेड) याची मारूती ८०० कार (क्र. एम एच १४ ए ई ११०३) घेवून कारेगाव येथून शिर्डीकडे दर्शनासाठी चालले होते.
पहाटे २ च्या सुमारास त्यांची कार चास जवळील घाटात आल्यावर वळणावर भरधाव वेगातील कारवरील चालक मयत अजित पटेल याचे नियंत्रण सुटले व कार पलटी झाली. या भीषण अपघातात दोघाजणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.