अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘तो’ तालुका पुन्हा गोळीबाराने हादरला; पोलिसांना मदत करतो म्हणून…

अहमदनगर- पुणे पोलिसांना वॉरंटमध्ये अटक करण्यासाठी मदत करतो म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी गज मारत बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याने नेवासा तालुका पुन्हा हादरला. काल गुरूवारी रात्री नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे ही घटना घडली.

 

दरम्यान हा वाद सोडवण्यासाठी मध्ये आलेल्याच्या डोक्यात मारहाण करण्यात आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख अशोक माळी (वय 25 रा. मोरेचिंचोरे) यांनी फिर्याद दिली आहे.

 

दिलेल्या फिर्यादीवरून नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब आल्हाट, देविदास उर्फ आबा विक्रम आल्हाट, लखन भाऊसाहेब आल्हाट, सागर बाबुराव इलग (सर्व रा. मोरेचिंचोरे) यांचे शवर सोनई पोलीस ठाण्यात 298/2022 भादवि कलम 307 ,324 506, 427 ,34 आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button