अहमदनगर ब्रेकींग: इंस्टाग्रामवर सुत जुळलेल्या युवकाकडून युवतीवर अत्याचार; गर्भवती युवतीची पोलिसांत धाव

नगर तालुक्यातील अल्पवयीन युवतीची राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीच्या युवकासोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यांच्यात फोनवर बोलणे होऊन दोघांची मैत्री झाली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. युवती गर्भवती राहिली. पीडित युवतीने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या युवक-युवतीचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यात शारिरीक संबंध आल्याने युवती गर्भवती राहिली. युवतीने त्या युवकासोबत लग्न करण्याची मागणी केली असता त्याने फोन बंद केला.
हा घडलेला प्रकार युवतीने तिच्या घरी सांगितला. त्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2021 मध्ये नगर तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली आहे.
युवती गर्भवती राहिल्यानंतर तीने गर्भवती राहिल्याची माहिती युवकाला दिली व त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली. युवकाने लग्न करण्यास टाळाटाळ केली. युवतीने त्याच्यासोबत फोनवर संपर्क केला, मात्र त्याचा फोन लागला नाही.
झालेला प्रकार युवतीच्या घरच्यांना माहिती झाला. पीडित युवतीने मंगळवार, 5 एप्रिल 2022 रोजी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून युवकाविरूध्द फिर्याद दिली.
पोलिसांनी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून ब्राम्हणीच्या युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.