अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार !

अहमदनगर ब्रेकिंग : नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 राहुरी तालुक्यातील गुहा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

वंदना विलास सौदागर असे मृत महिलेचे नाव असल्याचे समजते

सदर महिला नगर-मनमाड रस्ता ओलांडून घरी जात असताना अज्ञात वाहनाने तिला जोराची धडक दिली त्यात ती जागीच ठार झाली आहे.

स्थानिक तरुणांनी अज्ञात वाहनाचा पाठलाग केला मात्र ते वाहन मिळून आले नाही.

दरम्यान घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button