अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : अविवाहित तरूणाचा बुडून मृत्यू !

मुळा धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर येथील अविवाहित तरूणाचा बुडून मृत्यू झाला दरम्यान, या घटनेची राहुरी पोलीस आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना माहितीदेखील नव्हती.

स्थानिक नागरिकांनी त्या तरूणाचा मृतदेह वर काढून राहुरी येथील खासगी रूग्णालयात नेला असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी रमजान ईदच्या दिवशीच एका मुस्लिम युवकाचा मृत्यू झाल्याने श्रीरामपूरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुळा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांच्या बेपर्वाईमुळे मुळा धरण भागात बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढली असून या बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मुळा धरण परिसरात चमेरी विश्रामगृहानजिक काही तरूण मुळा धरण बघण्यासाठी आले होते. श्रीरामपूरला दुपारी ईदची नमाज पठण केल्यानंतर ते मुळा धरणावर आले होते. विश्रामगृहाच्या पायथ्याशी काही तरूणांनी धरणात उडी मारली.

त्यात एकजण बुडाला. त्याला अन्य तरूणांनी वाचविले. मात्र, दुसरा तरूण पाण्यात दिसेनासा झाला. त्याला शोधण्यासाठी तरूणांनी उड्या मारल्या. मात्र, त्यांना तो मिळून आला नाही.

अखेर त्या ठिकाणी अशोक भोसले, गणेश पाटोळे, सागर दुधाडे, नितीन साळुंके, यांनी पाण्यात उड्या मारून बेपत्ता तरूणाचा शोध घेतला. काही प्रयत्नानंतर तो त्यांच्या हाती लागला. त्याला तातडीने राहुरी येथील रूग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button