अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: चिमुरड्या भाऊ-बहिणीवर युवकाकडून अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर- नगर शहरातील उपनगरात राहणार्‍या दोन चिमुरड्यांवर (भाऊ- बहिण) एका युवकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या आईने तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून त्या युवकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तो युवक 17 वर्षीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

फिर्यादीचा सहा वर्षाचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी 27 ऑगस्ट रोजी शनिवार असल्याने सुट्टी असल्याने घरीच होते. दुपारच्या वेळी युवकाने फिर्यादीच्या मुलांना विश्‍वासात घेवून त्यांना क्लास घेतो असे सांगून त्याच्या राहत्या घरी बेडरूममध्ये बोलवून घेतले होते.

 

तेथे त्या युवकाने सुरूवातीला मुलीसोबत व नंतर मुलीसोबत बेडरूममध्ये अनैसर्गिक कृत्य केले आहे. 10 सप्टेंबर रोजी रात्री तो युवक फिर्यादीच्या घरी त्यांच्या मुलांना बोलावयला आला. परंतू फिर्यादीच्या मुलांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यानंतर ही घटना समोर आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button