अहमदनगर ब्रेकिंग : विखे आणि पवार आले एकत्र ! राम शिंदे गेले निघून….

Ahmednagar Breaking :- काल अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेल्या दोन राजकीय नेत्यांच्या गप्पा पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या भुवया उंचावल्या तर एका माजी मंत्र्यांनी चक्क कंटाळा आल्याने बाजूला गेल्याचे पाहायला मिळाले. या राजकीय गप्पा रंगल्या आहेत
अहमदनगरमध्ये भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटीलआणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भेट झाल्यानंतर ते बराचवेळ बोलत असल्याने घटनास्थळी असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या भुवया नक्की उंचावल्या असणार तसेच माजी मंत्री राम शिंदे यांच्या गप्पा रंगल्याचे पाहून बाजूला गेले.
अहमदनगरला भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची कर्जत येथील गोधड महारांचा पालखी सोहळ्या निमित्ताने दोघांची भेट झाली. त्यावेळी अनेक दिवसांनी भेटल्यानंतर ब-याच गप्पा रंगल्या होत्या.
तसेच पवार कुंटुंब आणि विखे पाटील कुंटुंबियांचा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. परंतु तरीही गप्पा रंगल्याने तिथं पालकी सोहळ्याला उपस्थित लोकांना आच्छर्य वाटले आहे.
महाराष्ट्रातल्या राजकारणात रोज नवा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातोय, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं गरम आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची बदनामी केली म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर आंदोलन केलं जातंय त्यामुळे नेमकी कोणत्या गोष्टी दोघांच्यात चर्चा झाली असावी असा प्रश्न उपस्थित असलेल्या अनेकांना पडला असेल.
सुप्रिया सुळे आणि सुजित विखे-पाटील यांचं मध्यंतरी जोरात शाब्दीक युध्द झाल्याचं पाहायला मिळालं. विखे पाटलांनी बंद पडलेले साखर कारखाने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी घेतल्याचा आरोप केला होता.
त्यावर सुप्रिया सुळेंनी कारखाने जेव्हा बंद पडले तेव्हा सहकारमंत्री कोण होते असं बोलून त्यांना चिमटा काढला होता. दोघांच्या झालेल्या शाब्दीक भांडणाला अधिक अवधी झाालेला नसताना सुध्दा रोहित पवार आणि विखे पाटलांची चर्चा रंगल्याने अनेकांना शंका वाटण स्वाभाविक आहे.
दोघांची चर्चा रंगल्याचे पाहताच तिथं उपस्थित माजी मंत्री राम शिंदे यांनी सगळ बाजूला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिथं उपस्थित तिन्ही पार्टीच्या लोकांच्या भुवया उंचावल्या. गप्पा संपल्यानंतर रोहित पवार यांनी विखे पाटलांना थेट गाडी पर्यंत सोडले.