अहमदनगरश्रीगोंदा

अहमदनगर ब्रेकिंग : सुजय विखेंच आता काय होणार ? राम शिंदें लोकसभा निवडणूक लढवणार !

राम शिंदे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिंदे यांनी ही इच्छा व्यक्त केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

त्यामुळे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांची मात्र धाकधुक वाढणार आहे. शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचे विविध अर्थही काढले जाऊ शकतात

२०२४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढविण्यासही मी इच्छुक आहे. पक्षाने तसा आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. २०१४ मध्ये दिलीप गांधी, प्रताप प्रताप ढाकणे आणि मी स्वतः इच्छुक होतो. मात्र त्यावेळी दिलीप गांधी यांना उमेदवारी निश्चित झाली.

Advertisement

२०१९ मध्ये मी लोकसभा लढवावी अशी कार्यकर्ते आणि काही आमदारांची देखील इच्छा होती. मात्र त्यावेळी डॉक्टर सुजय विखे यांचा भाजपात प्रवेश झाला आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने प्रयत्न केल्याचे शिंदे यांनी सांगितलं.

सध्याचे खासदार डॉ. विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगून मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

शिंदे विधानसभेची निवडणूक लढवतील. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि शिंदे यांच्यात पुन्हा लढत होईल, असे येथील राजकीय वर्तुळात गृहित धरले जात होते. मात्र, शिंदे यांनी वेगळीच घोषणा केली.

Advertisement

राम शिंदे म्हणाले…
भाजपने मला पूर्वी राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली होती. मात्र, पुढे काही कारणामुळे ते राहून गेले. राज्यसभेसाठी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाने सांगितले होते. तशी मी तयारी केली होती.

मात्र ऐनवेळी मला विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करायला सांगितला आणि नंतर मी आमदार झालो .२०१४ मध्ये मी लोकसभेसाठी इच्छूक होतो. तेव्हाही उमेदवारी मिळाली नाही. आता २०२४ ला मी तयारीशी उतरणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीही मनाची तयारी

Advertisement

सलग दुसऱ्यांदा माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढविण्याचे राहून गेले. मात्र आता २०२४ च्या निवडणुकीत मी विधानसभेची निवडणूक तर लढणार आहेच. मात्र आता लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीही मनाची तयारी ठेवली आहे.

जर आता तशी राजकीय परिस्थिती आलीच तर लोकसभा निवडणूकही लढवायची असे मी ठरविले आहे. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे यावेळी मी लोकसभा निवडणूक लढविण्यासही तयार आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

दरम्यान शिंदे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगीतल्याने मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राम शिंदेंच्या या घोषणेमुळे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांची जागा धोक्यात येणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button