
Ahmednagar breaking :- अहमदनगर जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टर विशाखा शिंदे यांच्या बाबतीत दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे गप्प का? असा सवाल आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केला
तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी हिरोगिरी करण्याच्या नादात मुख्य आरोपी डॉ. सुनील पोखरणा यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पगारे यांनी केला आहे.
राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब पगारे बोलत होते.यावेळी काकासाहेब येवले उपस्थित होते.पुढे बोलताना पगारे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात जळीताची जी दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दुर्घटनेत आजपर्यंत १२ जणांचे बळी गेले.
त्याठिकाणी अतिदक्षता विभागाची वातानुकूलित यंत्रणा आगीच्या भक्षस्थानी पडली. त्या प्रकारचा आणि कामावर असलेल्या डॉक्टर व परिचारिकांचा संबंध काय असा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यांना जर वातानुकुलित यंत्रणा दुरुस्तीचे काम येत असते,इलेक्ट्रिकचे उपकरणे दुरुस्तीचे काम डॉक्टर व परिचरिकांना येत असते तर ते डॉक्टर कशाला झाले असते असा प्रतिप्रश्न पगारे यांनी केला आहे .
रुग्णालयाचे मुख्य म्हणून डॉक्टर सुनील पोखरणा त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याच्या अगोदरच निष्पाप व शिकाऊ डॉ. विशाखा शिंदे व अन्य परिचारिकांना दोषी ठरवून पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी चमकोगिरी करत अटक केली हे करण्याअगोदर दोन दिवस चौकशीत गेले असते तर या नवोदित महिला डॉक्टरांचे परिचारिकांचे करियर अबाधित राहिले असते.
संदीप मिटके यांचा तपासच संशयाच्या फेऱ्यात आहे. एवढे सगळे होत असताना महाराष्ट्रभर आंदोलने सुरु असून देखील नगर दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे विखे यांनी आतापर्यंत एक चकार शब्ददेखील या प्रकरणावर काढलेला नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचे पगारे यांनी सांगितले.
एरवी प्रत्येक ठिकाणी धावपळ करणारे खासदार विखे हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील आहेत.मात्र परिचारिका व डॉ. विशाखा शिंदे यांच्या बाबतीत अनभिज्ञ का आहेत असा प्रश्न परिचारिका व डॉक्टर विशाखा शिंदे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक विचारीत आहेत असे पगारे यांनी सांगितले.
सरकारने निलंबित परिचारिका व शिकाऊ डॉक्टर शिंदे यांच्या वरील गुन्हे मागे घेऊन त्यांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावे त्याच बरोबर डॉ,विशाखा शिंदे यांना कायम स्वरूपी सरकारी सेवेत हजर करून घ्यावे यासाठी आरपीआय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलने करणार असल्याचे सांगितले.
Web Tital – Ahmednagar breaking : Why is Sujay Vikhe silent in civil burning case?