अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंध पकडल्याने पत्नीचा खुन ! ह्या ठिकाणी घडली घटना…

यात आरती राजेंद्र मुन्तोडे (वय 35, रा. शिबलापूर, ता. संगमनेर) या महिलेचा मृत्यु झाला आहे. या महिलेचा मृतदेह आश्वी खुर्द येथील पाटाच्या पाण्यात जखमी आवस्थेत मिळुन आला आहे.

त्यामुळे, यात राजेंद्र यशवंत मुन्तोड, रविंद्र यशवंत मुन्तोड, रंजना रविंद्र मुन्तोड, अलकाबाई यशवंत मुन्तोड, प्रकाश सखाराम गायकवाड, शिला प्रकाश गायकवाड अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.

राजेंद्र आणि आरती यांचे काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. मात्र, राजेंद्र यास बाहेरचा नाद लागल्यामुळे, त्याचे घरात फारसे लक्ष लागत नव्हते. हा प्रकार मयत आरती हिच्या लक्षात आला होता. त्यामुळे, तिने पतीस विचारले मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर मात्र हिने आपल्या पतीवर लक्ष ठेवले. दरम्यानच्या काळात राजेंद्र हा जवळच्या एका महिलेसोबत लगट करीत असल्याचे लक्षात आले असता तिने त्यांना समजून सांगितले. मात्र, हा प्रकार तरी देखील थांबला नाही. उलट राजेंद्र याने पत्नीस बेदम मारहाण केली. नंतर मात्र, यांचा राजरोस कारभार सुरूच राहिला.

दरम्यान, 28 मे 2022 रोजी सकाळी 12:30 वाजण्याच्या सुमारास बहिन भेटली नाही म्हणून त्याने पोलीस ठाणे गाठले आणि मिसिंग दाखल केली. त्यानंतर, प्रकाश सखाराम गायकवाड याने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की, आरती ही माळेगाव हवेली येथे आहे. असे सांगून लेखी जबाब दिली. मात्र, तो खोटा असून केवळ पोलिसांची दिशाभूल केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, दि. 30 मे 2022 रोजी सकाळी अविनाश यांना आश्वी येथून फोन आला. की, अश्वी खुर्द येथील पाटाच्या पाण्यात एक स्त्री जातीचे प्रेत पाईपला लटकलेले आढळून आले आहे.ती आरती असल्याची खात्री झाली. तिच्या हातावर, पोटावर फोड आलेले होते.

त्यावेळी दिसताच क्षणी हे लक्षात येत होते की, ही आत्महत्या नसून तिची हत्याच करण्यात आली आहे. त्यानंतर घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन आणि अन्य गोेष्टी झाल्यानंतर अविनाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button