अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: वायरमनसह ऑपरेटरही लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर- येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील निघोज येथे कारवाई केली आहे. शेतकर्‍याच्या घराचा जळालेल्या इलेक्ट्रीक मिटर बदलून देण्यासाठी 2 हजार 800 रुपयांची लाच स्विकारणार्‍या विद्युत वितरण कंपनीच्या वायरमन तसेच ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

 

किशोर बाळासाहेब कळकुटे (वायरमन) व विकास अशोक वायदंडे (ऑपरेटर) दोघेही निघोज सेक्शन अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी निघोज येथील वीज वितरण कार्यालय येथे सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात आले.

 

एसीबीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार निघोज परिसरातील एका शेतकर्‍याच्या घराचा इलेक्ट्रीक मिटर जळाला होता. तो बदलून नवीन बसवण्यासाठी वायमन कळकुटे याने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडतोडी अंती 2 हजार 800 रक्कम ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button