अहमदनगरकर्जतजामखेडताज्या बातम्या

Ahmednagar Breaking : खुनाच्या आरोपातून महिलेची निर्दोष मुक्तता

Ahmednagar Breaking –  मतेवाडी, ता.जामखेड येथील अनैतिक संबंधातून राहुल रिठे याचा खून केल्याचे आरोपातून दि.28/07/2017 रोजी सदर गुन्हा भा.द.वि.कलम 302, 201 सह 34 अन्वये आरोपी फुलाबाई विलास पागीरे व अन्य दोन यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

मयताचे शीर धडावेगळे केले तसेच हातपाय पण तोडले होते. ते वेगवेगळ्य गोण्यात भरले होते. तसेच जमिनीवर पडलेले रक्त धुवून टाकले होते व त्या गोण्या विहिरीत टाकल्या होत्या.

या आरोपाहून एकंदर तीन आरोपींचे विरोधात गुन्हा दाखल होता. त्याची सुनावणी श्रीगोंदा न्यायालयात होवून अन्य दोन आरोपींसहीत महिला आरोपी फुलाबाई विलास पागीरे हिची पण श्रीगोंदा येथील अति.सत्र न्यायाधिश श्री.एन.जी.शुक्ला यांनी निर्दोष मुक्तता केली. फुलाबाई हिचेतर्फे अ‍ॅड.सतिषचंद्र व्ही.सुद्रीक यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button