अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: महिलेने राहत्या घरात घेतला गळफास

राहत्या घरी एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील गावडे मळ्यात आज, रविवार ही घटना घडली.

मनिषा गिरीष गायकवाड (वय 43) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनिषा गायकवाड हिने राहत्या घरी गळफास घेतल्याने तिला तिचा पती गिरीष गायकवाड याने आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान मनिषा गायकवाड हिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नसून तोफखाना पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button