अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: रेल्वे रूळावर तरूणाची आत्महत्या

अहमदनगर – तरूणाने आजारपणाला कंटाळून धनगरवाडी शिवारात (ता. राहाता) रेल्वे रुळावर आत्महत्या केली. प्रसाद लक्ष्मण कदम (वय 42 रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रसाद हा जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक लक्ष्मणराव कदम यांचा मुलगा होता. तो प्राथमिक शिक्षक बँकेत नोकरीस होता. मंगळवारी सकाळी तो बँकेत जातो म्हणून तो घराबाहेर पडला तो घरी परतला नाही.

कुटुंबाने त्याची रात्री शोधाशोध केली मात्र तो मिळून आला नाही. मंगळवारी रात्री 8 वाजता तालुका पोलीस ठाण्यात धनगरवाडी रेल्वे चौकीजवळ अज्ञात इसमाने रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याची खबर आल्याने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अडांगळे व गोपनिय विभागाचे अनिल शेंगाळे यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

रेल्वे रुळाच्या कडेलाच लावण्यात आलेल्या दुचाकीवरून दुचाकी मालकाचे नाव शोधून अज्ञात मयताचा त्यांनी छडा लावला. बुधवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. काल दुपारी शोकाकूल वातावरणात प्रसाद याच्यावर टाकळीभान येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button