अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने राहत्या घरात घेतला गळफास

अहमदनगर – भिंगार शहरातील महेशनगर भागात राहत असलेल्या एका तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. लक्ष्मण बाबासाहेब घुले (वय 35) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

लक्ष्मण घुले हे भिंगार शहरातील महेशनगरमध्ये राहत होते. गुरूवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती समोर आली. त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतू ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण घुले यांनी आत्महत्या का केली याचा तपास भिंगार पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button