अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरलेला बहिणीचा उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने तरूणावर फायटर, कोयत्याने हल्ला केला. नगर तहसील कार्यालयात ही घटना घडली. भालचंद्र भरत म्हस्के (वय 30 रा. उकडगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांनी उकडगाव (ता. नगर) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बहिणीचा अर्ज माघारी घेतना नाही म्हणून ह घटना घडली आहे.

 

म्हस्के यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ भानुदास म्हस्के, मंदार ऊर्फ कृष्णा नवनाथ म्हस्के, आरकेष लांडगे (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर पाच ते सहा अनोळखी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

सध्या ग्रामपंचायत निवडणुक सुरू आहे. बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. फिर्यादी भालचंद्र म्हस्के व आरोपी नगर तालुका तहसील कार्यालयात हजर होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी फिर्यादीला म्हणाले की,‘तु तुझ्या बहिणीचा निवडणुक उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही’, असे म्हणून फिर्यादीला तेथेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

जीवे मारण्याची धमकी देत मंदार ऊर्फ कृष्णा नवनाथ म्हस्के याने त्याच्या हातातील फायटरने फिर्यादीच्या तोंडावर मारले व आरकेष लांडगे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या कपाळावर मारून जखमी केलेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार धिरज अभंग करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button