अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात बुडून तरूणाचा मृत्यू

राहुरी तालुक्यातील मालुंजा खुर्द येथे अंघोळ करण्यासाठी प्रवरा नदी पात्रात उतरलेले कैलास चौधरी हे नदीपात्रातील पाण्यात बुडून मयत झाल्याची घटना दि. 1 एप्रिल रोजी घडली.
कैलास नानासाहेब चौधरी वय 41 वर्षे, रा. दरडगाव तर्फे, बेलापूर ता. राहुरी हे दि. 1 एप्रिल रोजी त्यांचे काम आवरल्यानंतर दुपारी चार वाजे दरम्यान मालुंजा खुर्द येथील प्रवरा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना पोहता येत नव्हते.
नदीपात्रात उतरल्यावर त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. ते तसेच पाण्यात बुडाले. यावेळी त्या परिसरात असलेल्या काही महिलांनी त्यांना बुडताना पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील काही तरूणांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.
कैलास चौधरी यांचा पाण्यात शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.