अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दुचाकी-पिकअपच्या भीषण अपघातात तरूण ठार

अहमदनगर- दुचाकी- पिकअपच्या भीषण अपघातात चांदा (ता. नेवासा) येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील चांदा-घोडेगाव रोडवर पंचवटीजवळ घडली. शरद ऊर्फ राजेंद्र मोहन भगत (वय 46) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

चांदा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन भगत यांचे ते चिरंजीव होत.

 

शुक्रवारी दुपारी चार वाजेदरम्यान पिकअप गाडी चांदा रोडने घोडेगावकडे कांदा गोणी घेऊन जात असताना पंचवटीजवळ समोरून दुचाकीवर येणार्‍या राजेंद्र मोहनराव भगत यांची समोरासमोर धडक झाली. त्यात राजेंद्र भगत गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नगर येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

अपघात एवढा भीषण होता की त्याच्या प्रचंड आवाजाने आजबाजूच्या परीसरात घबराट पसरली होती. परिसरातील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. घटनास्थळापासून राजेंद्र भगत यांची वस्तीही याच रोडवर अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे.

 

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परीवार आहे. अपघातात गावातील तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ् व्यक्त केली जात आहे . दरम्यान सोनई पोलीस ठाण्याला घटनेची खबर मिळताच घटनास्थळी दाखल झाले. याबाबत 54/2022 क्रमांकाने अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद केली असून पुढील तपास हवालदार मच्छिंद्र अडकित्ते करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button