अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: युवकाने अल्पवयीन मुलीला पळवले

अहमदनगर- बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये राहणार्‍या चेतन संतोष सरोदे (वय 18) याने नगर शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चेतन सरोदे विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

अल्पवयीन मुलगी ही शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत होती. ती अल्पवयीन असल्याची माहिती चेतन सरोदे याला असताना, त्याने तिचा फोन नंबर मिळवून तिच्याशी फोनवर बोलणे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश देऊन तिच्याशी जवळीक निर्माण केली. ही बाब मुलीच्या आईच्या लक्षात आल्यावर मुलीच्या आईने चेतन सरोदे याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना, चेतनला समजावून सांगण्याबाबत समज दिली.

 

चेतनने मुलीच्या आईला दमबाजी केली होती. त्यानंतर त्याने शुक्रवारी अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चेतनविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button