अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: युवा सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले विष; कारण

अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावाचे युवा सरपंच अविनाश मिस्टर चव्हाण (वय 26) यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.इचव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर जाऊन विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. चव्हाण यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून यात त्यांना होणार्‍या त्रासाचे कारण नमूद असल्याचे समजते. सदरचा प्रकार नाजूक प्रकरणातून घडल्याचीही चर्चा सुरू आहे.

 

दरम्यान याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातून तोफखाना पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घटना घडलेली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तक्रार प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button