
Ahmednagar Breaking :- संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शिवारात मंगळवारी सकाळी भाऊसाहेब दत्तात्रय तळोले (वय 35) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मांची शिवारातील हॉटेल पुरोहित जवळ वनविभागाच्या क्षेत्रात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांना फोनवरुन मिळाली होती.
त्यामुळे घटनेचे गांभिर्य ओळखून दिलीप डेंगळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना देऊन ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी भाऊसाहेब तळोले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथिल कॉटेज रुग्णालयात पाठविला आहे.
तळोले याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी शोक केला आहे. दरम्यान तळोले याचा मृत्यू कशामुळे झाला ? की त्याचा कुणी घातपात केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.