अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद सदस्याला जिवे मारण्याची धमकी !

जिल्हा परिषद सदस्य सुनिताताई भांगरेंना जीवे मारण्याची दूरध्वनीवरुन धमकी दिल्याची माहिती आता समोर येत आहे. त्याबाबत सोशल मिडियात पोस्ट व्हायरल झाल्या असून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कार्यालय अंतर्गत चालणाऱ्या आश्रम शाळांमधील समस्या, अंदाधुंदी कारभार, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध समास्यांवर सुनिताताई भांगरे हे सातत्याने आवाज उठवत असतात.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील मुतखेल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्याठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्यात किडे, पाण्याचा कलर बदलणे, दुर्गंधी, स्वच्छता तसेच शाळेतील मुख्याध्यापकाची अनुपस्थिती मात्र शाळेच्या रॅकोर्ड वरती शाळेच्या कामकाजासाठी बाहेर गेले असल्याची नोंद करण्यात आली होती.
हा संपूर्ण प्रकार भांगरे यांनी बाहेर काढून येथील हलगर्जीपणा करणाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी याबाबत आवाज उठवला होता.
आज सकाळी सुनिताताई भांगरे यांचा दौरा सुरु असतांना ११ वाजून 49 मिनिटांनी एक फोन आला, तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका, तुम्हांला संपवून टाकू अश्या शब्दांत फोन वरुन भांगरे यांना धमकी देण्यात आली आहे.